Friday, September 11, 2026
HomeMulcheraनेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब गणेशनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण...

नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब गणेशनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून (30001/- रुपये) विशेष पारितोषिक.

Gadchiroli/मूलचेरा,२५ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशनगर येथे नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या फुटबॉल स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला होता. अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवा वर्गाला क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी पारितोषिके देत असतात व त्यांना क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब गणेशनगर येथील भव्य फुटबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या ‘गणेशनगर संघाला’ माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून विशेष पारितोषिक म्हणून शिल्ड व (30001/- तीस हजार रुपये) देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजेत्या ‘खुदिरामपल्ली संघाला’ शिल्ड व (20001/-वीस हजार रुपये) श्री.बादल शाह ग्रा.प.सदस्य यांच्या कडून देण्यात आले,तर शिल्ड व (10001/-दहा हजार रुपये) तृतीय क्रमांक विजेत्या ‘मथुरानगर संघाला’ गौरव बाला शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) यांच्या तर्फे तर चतुर्थ क्रमांक विजेत्या ‘जि.प.शाळा गणेशनगर संघाला’तसेच शिल्ड व (5001/-पाच हजार रुपये) नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब कमिटी तर्फे देण्यात आले.यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गौरव बाला शिवसेना तालुका प्रमुख मूलचेरा,प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक,संजीत मिस्त्री दिलीप मजुमदार, ग्रीस मंडल, मंगल मंडल, ललित गाईन,निरंजन मिस्त्री तसेच परिसरातील फुटबॉल प्रेमी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular