
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
धानोरा शहरातील शारदा व दुर्गा देवींचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दर्शन घेतले.
धानोरा येथील गरबा, दांडिया, जागरण कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन.
Gadchiroli/धानोरा, १० ऑक्टोंबर २०२४::- शहरात नवरात्री उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून घटस्थापनेच्या दिवशीच शहरासह सार्वजनिक मंडळांनी दुर्गा शारदा देवींची स्थापना केली आहे. नवरात्री उत्सवांमध्ये जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागात शारदा दुर्गादेवींची स्थापना करण्यात येते. या काळात सर्वत्र धार्मिक उत्साहाचे वातावरण राहते. मंडळांकडून दुर्गा, शारदादेवींची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव, महिला शारदा मंडळ, सर्वधर्म समभाव शारदा उत्सव मंडळ, बाल शारदा उत्सव मंडळ, सर्वधर्म संभाव दुर्गा उत्सव मंडळ धानोरा येथील मंडळाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी देवी चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले* *यावेळी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, अंतूभाऊ साळवे, शहर अध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक संजय कुंडू, ता. महामंत्री गणेश भूपतवार, बाळूभाऊ उंदीरवाडे, सुभाष धाईत, साजन गुंडावार, संतोष मिच, अनिल मशाखेत्री, घनश्याम मडावी, ताराबाई कोटांगले, सर्फराज शेख, योगिता गडपायले, सुषमा राखडे, विजया बारसागडे, भक्तदास गडपायले, दत्तू बावणे, करीम नजामी, प्रकाश कुर्जेकर, राकेश खरवडे, कल्पना उईके, कविता नैताम, वैशाली गव्हारे, विद्या कुमरे, संगीता गेडाम, दीपक भूषणवार, अमोल लेनगुरे, एकनाथ सोनुले, गिरीधर सोनुले, सुनीता कुमरे तसेच शारदा व दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
