
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
त्वरित रस्ता दुरुस्ती करून द्यावे,ग्रामपंचायत विसापुरचे उपसरपंच काशिनाथ बुरांडे यांची मागणी.
Gadchiroli/चामोर्शी, ११ ऑक्टोंबर २०२४::- मोठ्या शहरांमधील रस्ते खराब झाले आणि रस्त्यात खड्डे पडले तर नागरिक आवाज उठवतात. प्रशासनाला जेरीस आणले जाते. महामार्गावर खड्डे पडले तर त्याचीही दखल तातडीने घेतली जाते. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. चामोर्शी तालुक्यातील आमगाव,विसापूर व तळोधी रस्ता ‘आहे की संपूर्ण गायब झाला आहे’ अशी स्थिती दिसून येते आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यात जणू पाण्याचे तळेच साचले आहे. परंतु या रस्त्यावरून पायी चालणे, दुचाकी चालवणे तर शक्यच होत नाही. आपल्या शेतीतील कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे हाल होत आहेत.
तसेच ग्रामीण भागातील मार्गाने अनेक वाहने येत असतात. ग्रामीण भागातील लोक, शाळकरी मुल,मुली ,शेतकरी चामोर्शी शहरात समान खरेदी,शाळा, कालेज, शासकीय कार्यालयात याच मार्गाने येणे जाणे करावे लागते. जवळपास गडचीरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती पावसाने बिकट झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील आमगाव,विसापूर व तळोधी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या ग्रामीण रस्त्याच्या दुरूस्ती बाबत सावजानिक बांधकाम विभाग अतिशय दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्याच्या दयनीय अवस्थे संदर्भात आवाज उठवित प्रशासनाने रस्ते दुरुस्त लवकर करावे अन्यथा ?ग्रामपंचायत विसापूरचे उपसरपंच काशिनाथ बुरांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे.
