Saturday, May 23, 2026
HomeSironchaमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून रंगाय्यापल्ली बातकम्मा उत्सव महिला मंडळाला...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून रंगाय्यापल्ली बातकम्मा उत्सव महिला मंडळाला म्युझिक सिस्टीम(संगीत वाद्य) ची भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

Gadchiroli/सिरोंचा,११ ऑक्टोंबर २०२४::- जिल्ह्याच्या दक्षिण भागात दरवर्षी नवरात्री निमित्ताने बातकम्मा महोत्सवात मोठ्या धूम धडाक्यात महिला मंडळ साजरा करत असतात.सिरोंचा तालुक्यातील रंगाय्यापल्ली येथे प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बातकम्मा उत्सव साजरा करण्यासाठी तेथील महिला मंडळानी म्युझिक सिस्टीम(संगीत वाद्य) ची मागणी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडे केली.

त्यावेळी राजे साहेबांनी महिलांची ही मागणी मान्य करत रंगाय्यापल्ली येथील महिलांना स्थानिक कार्यकर्ते सुनील जिलकरी यांच्या माध्यमातून म्युझिक सिस्टीम(संगीत वाद्य) ची खरेदी करून महिलां मंडळाला भेट म्हणून दिली.त्यावेळी संपूर्ण महिला वर्गानी राजे साहेबांचे आभार मानले..!यावेळी ग्रामपंचायत रंगाय्यापल्लीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील जिलकरी,ग्रामपंचायत सदस्य पुष्पलता कुंमरी,माजी सरपंच दुर्गाम्मा कोरते,प्रतिष्ठित नागरिक कोंडुरी सत्यनारायण,रघुपती गुरनुले,संपत आतकुरी,सागर आतकुरी,नवीन जिलकरी,ईश्वर आईलवार,पद्मा आतकुरी,मलक्का जिलकरी,मनरक्का गावडे आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular