
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, १४ ऑक्टोंबर २०२४::- व्यंकटरावपेठा येथे दरवर्षी खूप उत्साहाने बतकम्मा उत्सव व शारदा देवीच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आले.
या निमित्त नुकतेच आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून बतकम्मा देवी व शारदा देवी चे विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले त्या नंतर महिलांचा आग्रहास्तव सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उत्सवात सहभाग घेऊन महिलांचा आनंद द्विगुणित केले.
या बतकम्मा उत्सव व शारदा देवी च्या पूजेच्या वेळी भाविक सह व्यंकटरावपेठा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
