Saturday, May 23, 2026
HomeGhotअल्लापल्ली वन विभाग अल्लापल्ली च्या संघटनेची कार्यकारणी घोट येथील जैव विविधता गार्डन...

अल्लापल्ली वन विभाग अल्लापल्ली च्या संघटनेची कार्यकारणी घोट येथील जैव विविधता गार्डन येथे गठीत करण्यात आली…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/घोट,२० ऑक्टोंबर २०२४::- दिनांक 19/10/24 रोजी घोट जैव विविधता गार्डन येथे महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर, आलापल्ली वनविभाग आलापल्लीच्या संघटनेची सभा पार पडली,सदर सभेचे आयोजन विभागीय अध्यक्ष श्री श्रीनिवास धानोरकर यांनी केले. सभेमध्ये निवडणुक अधिकारी मा. बाळुभाऊ मडावी, मा. नितेश कुमरे- गडचिरोली वनवृत्ताचे वृत्तिय अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात निवडणुक प्रक्रिया पार पडली. सर्वानुमते आलापल्ली विभागीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे गठित करण्यात आली. विभागीय अध्यक्ष -अतुल कातलाम, कार्याध्यक्ष -आकाश शेरकी, सचिव -नितेश मडावी , उपाध्यक्ष -कमलाकर चौधरी, कोषाध्यक्ष -निखिल गावडे, सहसचिव- संदीप चुधरी, संघटक- तुषार मडावी, प्रसिध्दी प्रमुख – शहाजत अली कादरी संघटक- संतोष परसा, संघटक- गणेश पस्पूनवार महिला संघटक- हर्षा घरत, नेहा मांदाडे, महिला प्रतिनिधी – शीतल उसेंडी, संघटक -अक्षय राऊत, संघटक-धंदरे, संघटक- रंजीत गावडे, संघटक-मसण्या कोकणारे व रंजीता दुग्गा, आणि वृतिय कार्यकारणी साठी श्रीनिवास धानोरकर यांची सर्वानुमते निवड झाली.संघटनेच्या सभेचे प्रास्ताविक वृत अध्यक्ष श्री. नितेश कुमरे यांनी केले, तर संचालन गडचिरोली वनवृत्ताचे वृत्तउपाध्यक्ष श्री. हरीश चंद्रुजी दहागावकर यांनी केले.आणि जेष्ठ पदाधिकारी श्री. बाळू भाऊ मडावी यांनी मार्गदर्शन केले. सदर सभेला आलापल्ली वनविभागातील वनरक्षक व वनपाल उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular