
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/मुलचेरा, २० ऑक्टोंबर २०२४::- स्थानिक मूलचेरा येथील राणीदुर्गावती चौकातील पटांगणात गोंडवाना क्रीडा मंडळ यांच्या तर्फे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील अनेक व्हॉलीबॉल संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.या कार्यक्रमात प्रथम क्रमांक बक्षीस माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे तर द्वितीय क्रमांक बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य राजमाता राणी रुक्मिणी देवी यांच्या कडून आणि तृतीय क्रमांक बक्षीस युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम यांच्या कडून बक्षीस देण्यात येणार आहेत.तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी पुरस्कार शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गावडे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मारोती वेलादी,उमाकांत आत्राम,गणेश बँकावार,अरविंदजी मुरमुरवार,संतोष गेडाम,जयराम मडावी आणि गोंडवाना क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक व व्हॉलीबॉल स्पर्धक उपस्थित होते.
