Saturday, May 23, 2026
HomeAheriकुणबी समाजाच्या समस्या दूर करणार - राजे अम्ब्रिशराव महाराज...

कुणबी समाजाच्या समस्या दूर करणार – राजे अम्ब्रिशराव महाराज…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अखिल कुणबी सेवा मंडळ तर्फे कोजागिरी व सत्कार समारंभ.

गडचिरोली/अहेरी, २३ ऑक्टोंबर २०२४::- तालुक्यातील नागेपल्ली येथील हनुमान मंदिर परिसरात अखिल कुणबी सेवा मंडळ तर्फे कोजागिरी व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे होते.त्यावेळी अखिल कुणबी सेवा मंडळ पदाधिकारी यांनी राजे साहेबांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहेत.कुणबी समाज संघटित झाला पाहिजे आणि संघटनात्मक बांधणीतून समाजाचा विकास होतो.येणाऱ्या काळात कुणबी समाजाच्या समस्या दूर करणार असे आश्वासन मी देतो असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कुणबी समाजाच्या सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सत्कार राजे साहेबांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी अखिल कुणबी सेवा मंडळाचे पदाधिकारी,कुणबी समाज बांधव,महिलावर्ग आणि नागेपल्ली ग्रामवासी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular