
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/मूलचेरा,२३ ऑक्टोंबर २०२४::- स्थानिक मूलचेरा येथील राणीदुर्गावती चौकातील पटांगणात गोंडवाना क्रीडा मंडळ यांच्या तर्फे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मोठ्या उत्साहात चार दिवस व्हॉलीबॉल स्पर्धेत स्पर्धकांनी आपली उत्तम गुणवत्तापूर्ण प्रदर्शन केलं.या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील अनेक व्हॉलीबॉल संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.या कार्यक्रमात प्रथम क्रमांक बक्षीस माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे तर द्वितीय क्रमांक बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य राजमाता राणी रुक्मिणी देवी यांच्या कडून आणि तृतीय क्रमांक बक्षीस युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम यांच्या कडून बक्षीस देण्यात आले.तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी पुरस्कार शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला यांच्या तर्फे देण्यात आले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते निखिल हलदार तर प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद मुरमुरवार,गणेश गारघाटे,श्रीनिवास कोकेरवार,किशोर मडावी,विजय शेट्टीवार व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
