Saturday, May 23, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे संविधान दिन मोठ्या आनंदाने...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे संविधान दिन मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी ,२७ नोव्हेंबर २०२४::- परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे आज दिनांक 26/11/2024 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल‌‌‌ चे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गणेश बोईनवार सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर,श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,श्री चंद्रकांत वेटे सर,श्री कमलाकर कोंडावार सर,सौ.सोनी संदोकार मॅडम,पुष्पा मोहुरले,नयना मोहुरले,संगिता राऊत तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्येशिकेचं वाचन करण्यात आले.

संविधान दिनानिमित्त शाळेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.विवीध वर्गातील विद्यार्थीनीने रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला* संविधान दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर,श्री राजकुमार कुळसंगे सर यांनी आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले.आणि संविधान दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.

आजच्या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार सर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर होते.विशेष अतिथी म्हणून श्री अशोक जुवारे सर,श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,श्री चंद्रकांत वेटे सर,श्री कमलाकर कोंडावार सर,सोनी संदोकार मॅडम,पुष्पा मोहुरल,नयना मोहुरले,संगिता राऊत आदी मान्यवर लाभले होते.

सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते संविधानाची प्रत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश बोईनवार सर व प्रमुख अतिथी श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी आपल्या भाषणातुन संविधानाची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री जगदीश कळाम सर यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular