Saturday, May 23, 2026
HomeKurakhedaवाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय गरोदर महिला ठार...

वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय गरोदर महिला ठार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/कुरखेडा,०७ डिसेंबर २०२४:::-गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात वाघांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या घटनासत्राला पुन्हा एकदा सुरवात झाली असून नरभक्षी वाघाने चातगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कुरखेडा येथील गर्भवती महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक सहा डिसेंबर शुक्रवारी दुपारी पाऊने चार वाजताच्या सुमारास घडलीशारदा महेश मानकर वय 26 वर्ष रा. कुरखेडा तालुका गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. तिला तीन वर्षाचा मुलगा असून ती आठ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहेकुरखेडा येथील महेश मानकर यांचे शेत गावापासून दोन किलोमिटर अंतरावर जंगलाला लागून आहे शारदा ही शेतावरधान पाकडण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.या दुर्दैवी घटनेने मानकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुरखेडा व नजिकचे गाववासी दहशतीतआहे.. वनविभागाने तातडीने या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरली असून गडचिरोली तालुक्यात पुन्हा एकदा वाघांच्या हल्ल्यात मनुष्य हानीचा प्रथ एरनीवर आला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular