Wednesday, August 5, 2026
HomeAheriयुवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना द्यावी : कंकडालवार...

युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना द्यावी : कंकडालवार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

गडचिरोली/अहेरी, २३ डिसेंबर २०२४::- तालुक्यातील मोदुमतुर्रा येथील रॉयल सि.सि.मोदुमतुर्रा द्वारे भव्य ग्रामीण क्रिकेट टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

उदघाटन दरम्यान कंकडालवारांनी पुढे बोलताना म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत.प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतःकडून पारितोषिक देत असताना माझा एकच उद्देश्य आहे कि युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगले खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.

क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून पाहिलं पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम कडून तिसरा पारितोषिक सरपंच वर्षा पेंदाम,विनोद आलम,शालिनी कांबडे कडून देण्यात येत आहे.

यावेळी मंचावर सरपंच वर्षाताई पेंदाम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,ग्रामपंचायत सदस्य विनोद आलम,अहेरी बाजार समितीचे संचालक प्रमोद पेंदाम,शालनीताई कांबळे,कविता सोयाम,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम,अजय पठाण,धमोदर वागडे,तूलशीराम कांबळे,पोचन्ना कांबळे,अरुण मज्जेलवर,चंद्रजी आलम, मज्जेलवार काका,स्वामीजी,ताशूभैया,सलामभैया,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular