Wednesday, September 16, 2026
HomeMulcheraमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अष्टमप्रहार महानाम संकीर्तन,भागवत प्रवचन कार्यक्रमाचे उदघाटन...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अष्टमप्रहार महानाम संकीर्तन,भागवत प्रवचन कार्यक्रमाचे उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/मूलचेरा, १८ जानेवारी २०२५::- तालुक्यातील भगतनगर येथील सार्वजनिक श्रीश्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.

मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील अनेक गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगतनगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता.

आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.तसेच मंदिरास विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.

यावेळी सुकुमार गोविंदास,नितेश मलिक,वसीम चक्रवत्री,संजय बॅनर्जी,राम मिस्त्री,बनवली मशनव,पूलक तालुकदर ग्रामपंचायत सदस्य,उल्लू व्यापारीसह परिसरातील नागरिक तसेच स्थानिक नागरिक,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular