Saturday, May 23, 2026
HomeChamorshiकन्सोबा मार्कंडा वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसाहायक रमेश बानोत यांना तात्काळ निलंबित करा,,विजयनगर येथील नागरिकांची...

कन्सोबा मार्कंडा वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसाहायक रमेश बानोत यांना तात्काळ निलंबित करा,,विजयनगर येथील नागरिकांची मागणी – राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी घेतली तक्रारीची दखल…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वनकायद्याचा धाक दाखवून लाठी काठीने मारहाण करणे व पैशाची मागणी करणाऱ्या मुजोर क्षेत्र सहायकाच्या त्रासाने विजयनगर येथील नागरिक एकवटले,

गडचिरोली/मुलचेरा, २५ फेब्रुवारी २०२५::- चामोर्शी तालुक्यातील कन्सोबा मार्कंडा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या विजयनगर,गांधीनगर,कालीनगर या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांच्याकडे या भागातील वन क्षेत्रसहाय्यक रमेश बानोत या वन अधिकाऱ्याची संपूर्ण कहाणी ऑन द व्हिडिओ रेकॉर्डिंग सांगितले गेल्या काही महिन्यापासून सदर वन अधिकारी या भागातील नागरिकांना वन कायद्याचा धाक दाखवून खूप त्रास देत आहे.

या भागातील दोन-तीन नागरिकांना लाठी काठीने मारहाण सुद्धा केलेली आहे तसेच अनेक नागरिकाकडून पैशाची सुद्धा मागणी केलेली आहे व पैसे घेतले सुद्धा आहेत, भ्रमनध्वनी वर पैश्याची मागणी केली त्याची रेकार्डिंग उपलब्ध आहे.

या वन क्षेत्र सहायकाच्या त्रासा पायी आज येथील महिलांनी सुद्धा ऑन द व्हिडिओ रेकॉर्डिंग येथील वन क्षेत्र सहाय्यक “बानोत हटाव विजयनगर बचाव “असा नारा दिला, यावेळी विजयनगर येथील अनेक नागरिकांनी एकत्रित येऊन शेकडो नागरिकांच्या सहीनिशी या वन क्षेत्र सहाय्यक यास निलंबित करण्याची मागणी केली व सर्वात आधी या उर्मट आणि मुजोर वन क्षेत्र सहायकास कंसोबा मार्कंडा वनपरिक्षेत्रातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली.

सदर वन अधिकारी मुख्यालय येथे राहता चामोर्शी येथून ये -जा करीत आहे तसेच याआधी सुद्धा या वन अधिकाऱ्याने विविध ठिकाणी अशा प्रकारे अनेक चुकीचे कार्य केलेले आहे, वनविभागाने तात्काळ या वनक्षेत्र सहायकास निलंबित न केल्यास मुख्य वनसंरक्षक, उप वन सरक्षक कार्यालयाच्या समोर गांधीनगर विजयनगर काली नगर येथील नागरिकांना घेऊन विराट जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दिला आहे.

कन्सोबा मार्कंडा वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक रमेश बानोत या यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल भाऊ झोडे, प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली सैयद,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा ताई मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, कृष्णा वाघाडे, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्निल मडावी, गांधीनगर विजयनगर, कालीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे बंगाली आघाडी जिल्हा महामंत्री विधान वैद्य, विजयनगर येथील भारतीय जनता पार्टी बूथ प्रमुख गणेश बाडई व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विजयनगर येथील शेकडो नागरिक बंधू व महिला भगिनी यांनी केली आहे,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular