Saturday, May 23, 2026
HomeChamorshiकामगारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन पेट्यांचे वाटप करा - माजी...

कामगारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन पेट्यांचे वाटप करा – माजी आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी येथिल कामगारांच्या पेटा वाटपात कामगारांची प्रचंड गैरसोय, हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करा.

गडचिरोली/ चामोर्शी, १० मार्च २०२५::- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून चामोर्शी येथे कामगारांना पेट्यांचे वाटप करण्यात येत आहे परंतु पेट्यांचे वाटप करताना कामगारांना दिवसभर उन्हा तान्हात ताटकळत ठेवून त्यांची प्रचंड गैरसोय करून कर्मचारी व अधिकारी या पेट्यांचे वाटप करताना दिसून येत आहे. याबाबत कामगारांमध्ये प्रशासनाविषयी चीड निर्माण होत असून त्या संदर्भात कामगारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन पेट्यांचे वाटप करावे अशी सूचना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी कामगार मंडळ प्रशासनाला केली आहे.**यावेळी त्यांनी वाटप होत असलेल्या ठिकाणाला भेट देऊन कामगारांची वार्तालाप केला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवसभर कामगारांना ताटकळत ठेवून त्रास देणाऱ्या व पेट्या वाटपात कामगारांची गैरसोय व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular