Wednesday, July 29, 2026
HomeAheriखेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे : माजी जि. अध्यक्ष...

खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे : माजी जि. अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन.

गडचिरोली/ भामरागड ,२३ मार्च २०२५::- तालुक्यातील सिपनपल्ली येथील गोंडवाना सुपर किंग्स क्रिडा मंडळ सिपनपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

उदघाटन कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी,गडचिरोली राष्ट्रीय मानवधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष महेश अलोणे हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तलंडी,उपसरपंच प्रमेश मडावी होते.

कार्यक्रमाचे सह अध्यक्ष म्हणून वेंकटी कोरेत,दौलत पेंदाम,श्यामराव सडमेक होते.सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी आणि महेशभाऊ अलोणे कडून तसेच तृतीय पारितोषिक मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तालंडे,उपसरपंच प्रमेश मडावी कडून देण्यात येत आहे.

उदघाटन दरम्यान कंकडालवारांनी पुढे बोलताना आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचे व क्षेत्रचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.यावेळी उदघाटन प्रसंगी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,चिंनू सडमेक प्रतिष्ठित नागरिक मंनेराजाराम,प्रविण मोगरकर,आकाश मोगरकर,राकेश मडावी रोजगार सेवक,

महेश कोडापे,रामू सडमेक,महेंद्र मडावी,गुरुदास सिडाम,अजित कोरेत,जयराम पेंदाम,राहुल मडावी,नितीन कोरेत,नरेश इस्टाम,राजेश इस्टाम,प्रदीप मडावी,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील क्रीडा प्रेमी,गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular