Monday, September 14, 2026
HomeAheriभाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता हा पक्ष निष्ठेने काम करणारा व संघटनात्मक...

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता हा पक्ष निष्ठेने काम करणारा व संघटनात्मक बळकटीसाठी वेळ देणारा असावा – मा.खा.डाँ.अशोक जी नेते यांचे बैठकीला मार्गदर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /अहेरी, ०८ एप्रिल २०२५::- भारतीय जनता पार्टी अहेरी तालुका बैठकीचे आयोजन आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनात पार पडली.या बैठकीत मार्गदर्शन करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा देशातील क्रमांक एकचा पक्ष असून, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाच्या मजबुतीसाठी काम करावे.

भाजप हा कार्यकर्त्यांचा परिवार आहे आणि प्रत्येकाने ही भावना मनात बाळगून संघटनात्मक बांधणी करावी.” भाजपा कार्यकर्ता कसा असावा, त्याने पक्षनिष्ठा कशी ठेवावी,पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी वेळ देणारा तसेच पक्षाशी प्रामाणिक राहून कार्य करण्याचे महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला.

आगामी तालुका अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन करत शांततेत आणि सुव्यवस्थितरीत्या निवडणूक पार पाडण्याच्या सूचना दिल्या.बैठकीला जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, निवडणूक निरीक्षक दामोदरजी एरिगेला यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बैठकीस मान्यवरांची उपस्थितीया बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, मच्छिमार सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनजी मदने, महिला आघाडीच्या महामंत्री रहिमा सिद्दीकी, वैशाली पोहनेकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, महामंत्री सुकमल हलदार, युवा नेते अमोल गुडेल्लीवार, शेंडेजी, पोशालू चुधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी मिळालेल्या डॉक्टरेट पदवीच्या निमित्ताने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular