Tuesday, June 16, 2026
HomeAramoriगडचिरोली येथे ३० जूनला गांधी चौकात धरणे आंदोलनसर्वपक्षीय बैठकीत बळजबरी प्रकल्पांविरोधात विद्रोहाचा...

गडचिरोली येथे ३० जूनला गांधी चौकात धरणे आंदोलनसर्वपक्षीय बैठकीत बळजबरी प्रकल्पांविरोधात विद्रोहाचा निर्णय…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /आरमोरी, २८ जून २०२५::- जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात व्यापक जनसंघर्ष उभारण्यासाठी डाव्या प्रागतिक पक्षांच्या वतीने आरमोरी येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन व विनाशकारी प्रकल्प आणि जनतेचा आवाज दडपण्यासाठी आणलेला जनसुरक्षा विधेयका विरोधात विद्रोह पुकारत ३० जून रोजी गडचिरोली येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ.डाॅ. महेश कोपूलवार होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी जिल्ह्यातील सर्व मंजूर व प्रास्तावित लोह खाणी, प्रक्रीया प्रकल्प आणि भूसंपादन याविषयी सविस्तर मांडणी केली. यानंतर उपस्थितांनी आप आपली मते मांडून बळजबरी भूसंपादन आणि बेकायदेशीर मंजूऱ्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त करत विरोध दर्शवला. पत्रके छापून प्रचार – प्रसार करणे व बाधीत क्षेत्रात स्थानिक स्तरावर परिषदा घेणे, त्यानंतर व्यापक मोर्चे आंदोलन करणे असा कार्यक्रम ठरविण्यात आला.

तसेच या बैठकीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष व संघटनांच्या सर्वपक्षीय प्रतिनिधींची जमीन बचाओ जनसंघर्ष समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचे निमंत्रक म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड तर सदस्य म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.डाॅ.महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी काॅ. अमोल मारकवार, काॅ.डाॅ. धर्मराज सोरदे, समाजवादी पक्षाचे ईलियास खान, डोमाजी दिवटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रशांत मडावी, शेकापचे भाई शामसुंदर उराडे, रमेश चौखुंडे आसपाचे रूषी सहारे तर सल्लागार म्हणून ॲड. जगदिश मेश्राम, ॲड. सोनाली मेश्राम यांची निवड करण्यात आली.या बैठकीला आसपाचे नेते धर्मानंद मेश्राम, भाकपचे काॅ. विनोद झोडगे, राजू केळझरकर, प्रेमचंद चिकराम, सीमा डोंगरे, मो. शरीफ, हाजरा बेगम, मनोज निमगडे,चुन्नीलाल मोटघरे, आपचे महादेव कोपूलवार, पंकज टिचकूले, अमोल मोटघरे, नागसेन खोब्रागडे, हंसराज उराडे, मेघराज भोयर, सुभाष आकलवार, पुरुषोत्तम रामटेके, धनराज दामले, सतिश दुर्गमवार, सुरेंद्र वासनिक, पियुष वाकडे, प्रितेश अंबादे, प्रकाश गेडाम, अक्षय पोरटे, किशोर म्हशाखेत्री, भगिरथ भाकरे, शुभम पोरटे, रमेश मेश्राम, रामदास डोंगरावर, संतोष लांजेवार, अविल पोरटे, संगिता मोटघरे, शुभम पाटील, सुरज ठाकरे, आशिष नेवारे, विजय सुपारे, संजय वाकडे, स्वाती खोब्रागडे यांचेसह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular