Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचामोर्शी-घोट परीसरातील जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावा - डॉ, प्रणय भाऊ खुणे,...

चामोर्शी-घोट परीसरातील जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावा – डॉ, प्रणय भाऊ खुणे, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, ०९ सप्टेंबर २०२५::- प्रशासनाने तात्काळ घोट परिसरातील जनतेचे मागणी पूर्ण करावे व प्रशासनाने लक्ष द्यावे याकरिता उद्या विराट जन आक्रोश आंदोलन खालील समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी मा, जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी संबंधित अधिकारी याना निर्देश द्यावेत.

प्रमुख मागण्या:-

1),घोट- रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावे,

2)अतिक्रमण जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले देण्यात यावे, गुगल मॅप द्वारे सर्च करुन पुरावा उपलब्ध करून पट्टे देण्यात यावे,

3) घोट तालुक्याची निर्मिती करण्यात यावी,

4)साखरदेव देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे,

5) मुतनूर व कोठरी पर्यटन स्थळाचा विकास करणे,

6)घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्या करिता शासनाने, प्रशासनाने घोट भागात उद्योग निर्माण करण्यात यावे,

7)चामोर्शी मूल मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,

8)गडचिरोली जिल्ह्यातील खड्डेमय विविध रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे,

9) तळोधी-कुरुड नदी पुलिया जवळ रस्ता दुरुस्ती करणे, नॅशनल हायवे वर जे खड्डे पडले,भेगा गेल्यात ते दुरुस्त करण्यात यावे,

10)सुरजागड व कोणसरी येथील लॉयड मेटल कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावे, परीसरात ITI निर्माण करुन लाॅयड्स ला जे कौशल्य प्रशिक्षण लागते ते प्रशीक्षण या ITI मधुन देण्यात यावे,

11) दिना धरणाची उंची वाढवुण ,पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाची खोलीकरण करण्यात यावे,

12)चामोर्शी तालुक्यात दारूबंदी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी,

13) मछली -चापलवाडा बस सुरू करण्यात यावे,

14) घोट -नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,

15) दिना धरन परिसर सौंदर्यीकरण करण्यात यावे,

16) घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे,

17) चामोर्शी येथे एमआयडीसी निर्माण करण्यात यावे,

18) घोट ते जिल्हा परिषद शाळा पर्यंत रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावे,

19) घोट येथे स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय उभारावे,

20)ओबीसी समाजाचे प्रलंबित प्रश्न राज्य शासनाने सोडवावे,

21)जिल्ह्यतील झाडे समाजाचे प्रश्न राज्य सरकारने सोडवावा,

23) बंगाली समाजाचे विविध प्रलंबित समस्या राज्य सरकारने सोडवावा.

या व इतर समस्या तात्काळ मार्गी लावण्या बाबत राज्य सरकारने द्यावे याकरिता घोट मार्गावरील नवेगाव येथे उद्या विराट जनआंदोलन आयोजित करण्यात येत आहे तरी घोट परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आयोजित जनआंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular