Saturday, June 6, 2026
HomeChamorshiकुरंडी माल येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी,, गावकऱ्यांची माजी आमदार...

कुरंडी माल येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी,, गावकऱ्यांची माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे साकडे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, १७ डिसेंबर २०२५::- कुरंडी माल परिसरात धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे केली आहे.

कुरंडी माल व परिसरातील एकूण १२ गावांतील शेतकऱ्यांची धान खरेदी मागील ३० ते ३५ वर्षांपासून कुरंडी माल येथे नियमितपणे केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र मागील ४ ते ५ वर्षांपासून हे धान खरेदी केंद्र बंद करून देलणवाडी येथे सुरू करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

देलणवाडी हे ठिकाण लांब असल्याने वाहतूक खर्च वाढत असून वेळ, पैसा आणि मेहनत यांचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे. अनेक लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या कारणामुळे धान खरेदीसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकत्र येत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. कुरंडी माल येथे पूर्वीप्रमाणे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून परिसरातील १२ गावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. येत्या 29 तारखेला सदर केंद्राचे विधिवत उदघाट्न करून धान खरेदी सुरु करण्याचे ठोस आश्वासन दिले. यावेळी वासुदेव मडकाम अध्यक्ष धान खरेदी केंद्र कुरंडी माल, विकास पायदलवार, किशोर ढवळे, यशवंत मडकाम, विनायक मडावी रोहिदास उईके, सोनल उईके आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular