Friday, May 22, 2026
HomeBhamragadशहीद सी C-60 जवान दिपक चिन्ना मडावी यांना मानवंदना देताना स्थानिक आमदार...

शहीद सी C-60 जवान दिपक चिन्ना मडावी यांना मानवंदना देताना स्थानिक आमदार डॉ. नरोटेच गैहजार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 पोलीस मुख्यालयात मानवंदना, वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती,

गडचिरोली/भामरागड,०७ फेब्रुवारी २०२६::- भामरागड तालुक्यातील फोदेवाडा येथील घनदाट जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत एका मोठ्या नक्षली नेत्यासह एकूण सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

मात्र या यशस्वी कारवाईदरम्यान C-60 पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय 38) हे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले, तर जोगा मडावी हे गोळी लागून जखमी झाले आहेत.

शहीद जवान दीपक चिन्ना मडावी हे सध्या अहेरी येथे वास्तव्यास होते. त्यांचा मूळ पत्ता मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी असा आहे. अभियानादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना पहाटे अबुझमाड येथील जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे आणण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

या चकमकीत आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे रात्री गोळी लागून जखमी झाले. त्यांनाही हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढून उपचारासाठी भामरागड येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयात मानवंदना; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती,

शहीद जवान दीपक चिन्ना मडावी यांच्या शहादतीची बातमी गडचिरोली जिल्हाभर पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली. आज गडचिरोली पोलीस मुख्यालयात विभागीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्रद्धांजली कार्यक्रमाला आमदार मिलिंद नरोटे अनुपस्थित; राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया

मात्र शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गडचिरोलीचे स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे अनुपस्थित राहिल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक जवान नक्षलवाद्यांशी लढताना शहीद होत असताना त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवणे, हे दुर्दैवी आणि असंवेदनशील असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Oplus_131072

“स्थानिक आमदारांना गडचिरोलीच्या शहिदांबद्दल सहानुभूती नाही का?” असा थेट सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. जर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीच शहिदांच्या मानवंदना कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांच्या मानवीय संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा सूर नागरिक आणि राजकीय वर्तुळात उमटत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात C-60 चा जवान नक्षलवाद्यांशी लढताना शहीद होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षातीलच स्थानिक आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत, यामुळे राज्याच्या नेतृत्वाची प्रतिष्ठा स्थानिक पातळीवर कशी जपली जाईल, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular