VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /अहेरी,०३ एफ्रिल २०२६::-तालुक्यातील आलापल्ली येथील श्रीभगवान हनुमान जन्मोत्सव निमित्त बजरंग चौक येथील युवक – टायगर ग्रुपच्या पदाधिकारी तर्फे दरवर्षी प्रमाणे या’वर्षी सुद्धा भव्य शोभायात्रा काढण्यात आले आहे.
त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.हनुमंतू मडावी यांनी पवनसुता हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेत सहभागी होऊन भगवान हनुमान भक्तांच्या आनंद द्विगुणीत केले.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच टायगर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य – हजारोंच्या संख्येने आलापल्ली नगरवासी उपस्थित होते.
