Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiचामोर्शी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर...

चामोर्शी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, २१ जून २०२६::- चामोर्शी पत्रकार संघाची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीत पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली.

चामोर्शी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विनोद खोबे यांची निवड करण्यात आली. सोनू वाळके यांची सचिवपदी, नितेश गट्टीवार यांची कार्याध्यक्षपदी, तर धनराज वासेकर व श्रावन वाकोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अरुण गव्हारे यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, मारोती बारसागडे यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच हस्ते भगत यांची सल्लागार, सुखसागर झाडे यांची संघटक आणि पुंडलिक भांडेकर यांची सहसंघटकपदी निवड करण्यात आली.

बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. संघटन अधिक सक्षम करण्यासह पत्रकारांच्या आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच विविध समस्यांवर एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular