Tuesday, September 15, 2026
HomeChamorshiमारोडा ग्रामपंचायतीचा आष्टी अपर तहसीलला जोडण्यास ग्रामस्थानांचा तीव्र विरोध...

मारोडा ग्रामपंचायतीचा आष्टी अपर तहसीलला जोडण्यास ग्रामस्थानांचा तीव्र विरोध…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन,

गडचिरोली /चामोर्शी, ०२ जून २९२६::- ग्रामपंचायत मारोडा महसूल मंडळाचा समावेश आष्टी येथील अपर तहसील कार्यालयात करण्याच्या प्रस्तावाला ग्रामपंचायत मारोडाने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांना निवेदन सादर करून मारोडा गावाचा समावेश चामोर्शी तहसील कार्यालयातच कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उपविभागीय अधिकारी यांच्या उद्‌घोषणेनुसार मारोडा महसूल मंडळाचा समावेश आष्टी येथील अपर तहसील कार्यालयात करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, मारोडा ते आष्टी हे अंतर सुमारे ३५ किलोमीटर असून, मारोडा ते चामोर्शी हे अंतर केवळ ७ किलोमीटर आहे.

त्यामुळे नागरिकांना महसुली कामांसाठी अनावश्यक प्रवास करावा लागेल तसेच वेळ व आर्थिक खर्च वाढणार असल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.यामुळे मारोडा ग्रामपंचायतीचा समावेश अपर तहसील कार्यालय आष्टीमध्ये न करता, विद्यमानप्रमाणे तहसील कार्यालय चामोर्शी येथेच कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर ग्रामपंचायत मारोडाचे प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular