VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे,
गडचिरोली/अहेरी,०४ जुलै २०२६::- अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये नुकतेच डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने आरोग्य सेवा कोलमडली होती त्यामुळे सर्वत्र ओरड सुरू झाली होती. जिल्हा शल्यचिकित्सिका लहाडे मॅडम यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे अहेरीतील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. लहाडे मॅडमची कारकीर्द अगोदर पासूनच वादग्रस्त राहिलेली आहे असे असूनही त्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक सारख्या अतिमहत्वाच्या पदावर नेमणूक कशी झाली अशी विचारणा करण्यात येत आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, मुकेश नामेवार, संजय पोहणेकर यांनी *मुंबई विधानभवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन अहेरीतील रुग्णालयाची परिस्थिती लक्षात आणून दिली आणि वादग्रस्त अधिकारी लहाडे यांची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने जिल्हा बाहेर त्यांची बदली करावे तसेच तातडीने पूर्णवेळ डॉक्टरांची नियुक्ती करावे अशी मागणी करण्यात आली.* तसेच अहेरी रुग्णालयात डॉक्टर प्रतिनियुक्ती केल्यानंतरही काय काय अडचणी येत आहेत याची सुद्धा माहिती दिली.
आरोग्य मंत्र्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखुन तत्काळ लहानेंच्या चौकशीचे निर्देश दिले, तसेच लवकरात लवकर उत्तम तज्ञ डॉक्टर अहेरीला पाठविण्यात येतील असा सकारात्मक प्रतिसाद ह्यावेळी दिला त्यामुळे आता अहेरी महिला बाल रुग्णालयातील अडचणी दूर होऊन रुग्णांना दिलासा मिळनार आहे.
