VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
बूथ प्रमुखांच्या गृहभेटी व बैठक संपन्न,
डॉ. प्रणय भाऊ खुणे भाजपा, जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत,
गडचिरोली /घोट,११ जुलै २०२६::- रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रात बीएलओ-1 व एसआयआर कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने बूथ प्रमुखांच्या प्रत्यक्ष गृहभेटी, संवाद व आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी घोट मंडळ भाजपाचे अध्यक्ष राकेश सरकार यांनी मौजा पुसेर, पावीमुरंडा, कोठरी, भाडभीडी, घोट, मछली, चापलवाडा तसेच परिसरातील विविध गावांना भेट देत बूथ प्रमुखांशी संवाद साधला. बीएलओ-1 तसेच एसआयआर कार्यक्रमाची अंमलबजावणी वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष गृहभेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील ज्येष्ठ नेते बिरेन विश्वास, उपसरपंच मिहीर विश्वास, पंचायत समिती क्षेत्र प्रमुख पलाश घरामी, विनोद किरमे, महेश विश्वास, विकास मैत्र, सोम वैद्य, आदिवासी आघाडी अध्यक्ष विलास उईके, राजू सातपुते, संदीप भोवरे, रमेश लेकलवार तसेच भाजपाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक बळकटीकरण आणि बीएलओ-1 व एसआयआर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
