Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiविनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...

विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन,

गडचिरोली/चामोर्शी,१० जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक पोस्ट परिसरातील नो फ्लाइंग झोनमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ड्रोन उडविल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी संबंधितांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुधोली चेक पोस्ट परिसरात ड्रोन उडविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संबंधितांकडे ड्रोन उडविण्याची आवश्यक शासकीय परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली.

दरम्यान, घटनेनंतर काही नागरिकांनी संबंधितांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणे अयोग्य असून कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नो फ्लाइंग झोनमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडविणे हा गंभीर कायद्याचा भंग असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

 तसेच नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular