VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते हरित भविष्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश,
गडचिरोली/देसाईगंज (वडसा),१४ जुलै ::- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त देसाईगंज (वडसा) येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या बसस्थानक परिसरात मंगळवारी वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आमदार मा. श्री. रामदासजी मसराम यांच्या शुभहस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भावी पिढ्यांसाठी हरित आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी आगार व्यवस्थापक प्रभारी वासनिक, वाहतूक नियंत्रक गजपुरे मॅडम, सह वाहतूक निरीक्षक मगरे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, धनपाल मिसार सर, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके, नगरसेविका राधिका पत्रे, आशाताई दहिवले, मंदा समर्थ, साजन मेश्राम, प्रमोद मेश्राम, सागर वाढई, स्वप्निल मिसार, गौरव शिलार, वाहन चालक गुरुदत्त गजपुरे तसेच सुरेकुमार ठवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. उपस्थितांनी “एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया” हा संकल्प करून हरित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

