VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
‘हर घर तिरंगा’, तिरंगा यात्रा, ‘मन की बात’सह आगामी उपक्रमांचे नियोजन; बूथस्तरावर जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार,
गडचिरोली /चामोर्शी,०७ ऑगस्ट २०२६::- भारतीय जनता पक्षाच्या चामोर्शी तालुका संघटनेची मासिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी राष्ट्रीय व संघटनात्मक कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच बूथस्तरावरील संघटना अधिक सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार चामोर्शी येथील आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. २ जनसंपर्क कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली, तालुका प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या ‘तिरंगा यात्रा’, ‘हर घर तिरंगा’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण तसेच ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ या उपक्रमांच्या नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्येक गाव आणि बूथपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे सांगितले. बूथ सक्षमीकरण, जनसंपर्क वाढविणे, संघटन विस्तार तसेच BLO सोबत SIRचे काम पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांनीही अध्यक्षीय मार्गदर्शन करत आगामी कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान संघटनात्मक जबाबदाऱ्या, सदस्य नोंदणी, बूथ सक्षमीकरण, जनसंपर्क अभियान आणि आगामी कार्यक्रमांच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी सर्व उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस तालुका अध्यक्षा श्रीमती रोशनीताई वरघंटे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीपजी चलाख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, तालुका महामंत्री संजय खेडेकर, तालुका उपाध्यक्ष राजुभाऊ चुधरी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. कविताताई किरमे, माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पाताई रॉय यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
