VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /अहेरी,१३ ऑगस्ट २०२६::- संकटाची वेळ कोणतीही असो, गरजूंच्या मदतीसाठी धावून जाण्याची भूमिका डॉ. अजय कंकडालवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली. इतलचेरू येथील उज्वला आत्राम यांची अचानक प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीच अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठून रुग्णाची विचारपूस केली.
किष्टापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या जीवनकला ताई यांनी रात्री डॉ. कंकडालवार यांना दूरध्वनीवरून उज्वला आत्राम यांच्या प्रकृतीची माहिती दिली. माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी वेळ न दवडता रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी उज्वला आत्राम यांची भेट घेऊन प्रकृतीची माहिती घेतली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून पुढील उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्याचा निर्णय घेतला.

या प्रसंगी डॉ. कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “पुढील उपचारादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मला तातडीने संपर्क करा; शक्य ती सर्व मदत केली जाईल,” असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या या तत्परतेमुळे संकटाच्या काळात आत्राम कुटुंबाला मोठा आधार मिळाला. त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.
