Saturday, September 5, 2026
HomeAheri७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत इंदारामाचा डंका; अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा...

७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत इंदारामाचा डंका; अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /अहेरी, १६ ऑगस्ट २०२६::- तालुक्यातील इंदाराम येथे ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान इयत्ता ७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून, त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे इंदाराम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular