VAINGANG NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /अहेरी, 31 ऑगस्ट 2026::- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी विविध वृक्षांची लागवड करून ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात आला. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष श्री. रमेश चुक्कावार, सत्यनारायण गुप्ता, महिला प्रमुख संगीता वळदे, तालुका उपाध्यक्ष मोहन दुर्गे, युवा तालुका प्रमुख प्रवीण दहागांवकर, शहर महिला प्रमुख करिष्मा गुरुनुले, आलापल्ली शहर प्रमुख श्री. दसरवार, महिला जिल्हा प्रमुख संगीता राऊत, भामरागड युवा प्रमुख अक्षय पुसली, गणेश मुलकलवार तसेच आदिवासी आघाडी प्रमुख तलांडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श घालून देण्यात आला.
