VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
ई-पिक पाहणी करा, पिकांची नोंद सातबाऱ्यावर निश्चित करा,
५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची मुदत; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन,
गडचिरोली /चामोर्शी, 01 ऑक्टोबर 2026::-खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने चामोर्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी करून नोंद सातबाऱ्यावर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी ‘DCS MH’ मोबाईल ॲपद्वारे स्वतःच्या मोबाईलवरून किंवा ई-पिक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंद करावी. ही प्रक्रिया ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ई-पिक पाहणीद्वारे पिकांची नोंद झाल्यास भविष्यातील शासकीय योजना, पीक नुकसान भरपाई व दुष्काळाशी संबंधित मदत मिळविताना नोंद महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही हलगर्जी न करता मुदतीपूर्वी ई-पिक पाहणी पूर्ण करावी.
ई-पिक पाहणी न केल्यास संबंधित शेतजमिनीवरील पीक नोंद उपलब्ध न राहण्याची शक्यता असून, त्यामुळे शासकीय मदत किंवा योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे “ई-पिक पाहणी करा आणि आपल्या पिकाची नोंद सुरक्षित करा”, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-पिक पाहणी सहाय्यक :-
शंकर बोदलकर, रा. चामोर्शी — 📞 9923486726
कर्तब वासेकर, रा. चामोर्शी — 📞 8788906068
गुरुदेव बारसागडे — 📞 9673454564
शेतकरी बांधवांनी ५ ऑक्टोबरपूर्वी ई-पिक पाहणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
