Friday, May 22, 2026
HomeAheriकोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान...

कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक.

सिरोंचा , ३० नोव्हेंबर २०२३ ::- तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये कोटापल्ली ग्रामपंचायतीचे 7 ग्रामपंचायत सदस्य पैकी उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 4 विरुद्ध 3 मतांनी भाजपाचे उमेदवार तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे कट्टर समर्थक श्री.सुरेश मडावी हे उपसरपंच पदी आज विजयी झाले आहेत.

      उपसरपंच पदाची निवडणूक माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली होती.       उपसरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत समोर संपूर्ण कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.यावेळी भाजपचे सुरेश व्यंकटी मडावी उपसरपंच,रजिथं स्वामी नाईनी,मुत्ताक्का रमेश पोलामपाल्ली,सुजता लक्समन अट्टे ग्रामपंचायत सदस्य,स्थानिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular