VAINGANGA NEWS 24
प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार
भामरागड ,३० नोव्हेंबर २०२३ ::- २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभाग यांच्या संयुक्त चमूद्वारे एटापल्ली ते जिवनगट्टा रोडवर वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या शामराव रमेश नरोटे वय ३० वर्ष रा.वासामुंडी व अमजत खा अमीर खा पठाण वय ३७ वर्ष रा.एटापल्ली या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाईत आरोपीकडून वाघाची कातडी,हिरोहोंडा मोटारसायकल व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर वनगुन्हा प्रकरणी आरोपी शामराव रमेश नरोटे व अमजत खा अमीर खा पठाण यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८,४९,ए ४९,बी ५० अन्वये वनगुन्हा क्र.१२/२०२३ दिनांक २९ नव्हेंबर २०२३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
उपरोक्त कारवाही ही श्री.रमेशकुमार वनसंरक्षक,गडचिरोली वनव्रत यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री.शैलेश मीना व उदंती सितानदी टायगर रिजर्व छत्तीसगड वनविभाग उप निदेशक श्री.वरून जैन व चमू यांचेद्वारे संयुक्तरित्या कारवाही करण्यात आली.याबाबत श्री.राहुल टोलिया उप वनसंरक्षक आलापल्ली,श्री.गणेश पाटोळे, विभागीय वनअधिकारी दक्षता यांचे सहकार्य लाभले.कारवाईत श्री.चरण भेडके वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली,श्री.सुशील हलामी,श्री.धनिराम पोरेटी व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी पुढील तपास श्री.अशोक पवार सहायक वनसंरक्षक भामरागड यांचे मार्फत सुरू आहे.
