VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
सिरोंचा, ०३ डिसेंबर २०२३ ::- तालुक्यातील मादारम ग्रामपंचायत चे उपसरपंच सुरेश जंग यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिले.
मादारम ग्रामपंचायत चे उपसरपंच सुरेश नानय्या जंग यांनी आपल्या गावात म्हणजेच पुसुकपल्ली येथे नूतन घर बांधकाम केले.त्यांनी नुकतेच गृहप्रवेश कार्यक्रम ठेवला होता.या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शविली आणि जंग परिवाराला भरभरून शुभेच्छा दिले.
यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
