Saturday, June 6, 2026
HomeAheriविदर्भ राज्य आंदोलन पुन्हा जोर पकडणार, विदर्भ निर्माण संकल्प यात्रेला विदर्भ आंदोलनाची...

विदर्भ राज्य आंदोलन पुन्हा जोर पकडणार, विदर्भ निर्माण संकल्प यात्रेला विदर्भ आंदोलनाची जन्मभूमी अहेरी येथून सुरुवात…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

विदर्भवीर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांचे आशीर्वाद घेत ऍड. वामनराव चटप यांचा नेतृत्वाखाली संकल्प यात्रेला सुरुवात.     अहेरी, ०३ डिसेंबर ,२०२३ ::- वेगळे विदर्भ राज्यासाठी कट्टर विदर्भवादी नेते कै.राजे विश्वेश्वरराव महाराज, कै. राजे सत्यवानराव महाराज यांचा नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनाची साक्षीदार असणाऱ्या        विदर्भ आंदोलनाची जन्मभूमी राजनगरी अहेरी येतूनच पुन्हा नव्या जोमाने जनतेमध्ये जनजागृती करून स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन पटविण्यासाठी विदर्भ निर्माण संकल्प यात्रेची सुरुवात काल करण्यात आले.

   जीवनाचा शेवटच्या श्वासापर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संघर्ष करणारे विदर्भवीर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या अहेरीतील मुख्य चौकातील पूर्णाकृती पूतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांचे आशीर्वाद घेत माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांचा नेतृत्वाखाली ही संकल्प यात्रा अहेरी येथून सुरू करण्यात आले.       ह्यावेळी जय विदर्भचा नार्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला, ह्या प्रसंगी मोठ्या संख्येने विदर्भवादी नेते तथा कार्यकर्ते उपस्थित होते..!! जय विदर्भ.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular