Friday, May 22, 2026
HomeBhamragadमाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी येचली येथील श्री.राजन्ना अंकुलू येर्रावार या...

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी येचली येथील श्री.राजन्ना अंकुलू येर्रावार या अपघात ग्रस्तांला पुढील उपचाराकरिता केली आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/भामरागड,०६-०१-२०२४::- भामरागड तालुक्यातील येचली येथील रहिवासी असलेले श्री.राजन्ना अंकुलू येर्रावार हे काही दिवसा अगोदर आपल्या दुचाकी वाहनाने बोरी येथे काही कामा निमित्त गेले असता,परत येचली येथे येत असताना त्याच्या दुचाकी वाहनाचा अपघात झाला.त्या अपघातात राजन्ना येर्रावार हे गंभीर जखमी झाले आणि यात त्यांच्या पायाला जबर जखम झाली.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि त्यांच्यावर उपचार सुध्दा झाला, पण आजही त्यांना बरोबर चालता येत नाही,पुढील उपचार खाजगी रुग्णालयात करण्यासाठी घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली.

ही राजन्ना अंकुलू येर्रावार यांची आर्थिक अडचण माहीत होताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांच्या पुढील उपचारासाठी 10000(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपघात ग्रस्त,कॅन्सर ग्रस्त आणि आर्थिक अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करत असतात.त्यांनी आतापर्यंत अनेकांना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कार्यकर्ते वैभव पूज्जलवार,रमेश तलांडी,पवन पूज्जलवार,राजेश पूज्जलवार,हणमंतु येर्रावर,विनोद पूज्जलवार,श्रीनिवास गुन्नालवार व येर्रावार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular