Friday, May 22, 2026
HomeAheriपत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती युवा पत्रकार संघटनेच्या वतीने विविध...

पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती युवा पत्रकार संघटनेच्या वतीने विविध उपक्रमात साजरी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०६-०१-२०२४::- आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृहात युवा पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधूकर गोंगले यांच्या पुढाकाराने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

   यावेळी पत्रकार दिनानिमित्त ०६ जानेवारी २०२४ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते.सहा जानेवारी हा पञकार दिन असुन महाराष्ट्रामध्ये पहिले मराठी वृत्तपञ दर्पण म्हणून आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांनी सुरू केले व लोकांना स्वातंञ व हक्क आधिकारा करिता जन जागृती करण्याचे कार्य हाती घेतले.    आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा पञकार बांधवातर्फे गडचिरोली जिल्हा युवा पत्रकार संघटने तर्फे पञकार दिननिमित्त आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस भास्कर फरकडे गडचिरोली वार्ता न्युज पोर्टलचे संपादक यांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले असुन संघटनेचे पदाधिकारी तथा युवा पञकाराच्या हस्ते पुजन करुन मानवंदना देण्यात आली.  

    व विविध विषयांवर चर्चा करून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्याचे आयोजन करून फळवाटप करण्यात आले.

  यावेळी श्री.मधूकर गोंगले महाराष्ट्र संदेश न्युज जिल्हा प्रतिनिधी,श्री.श्रावण वाकोडे VAINGANGA NEWS 24 – संपादक, श्री.अशोक खंडारे वैनगंगा वार्ता न्युज संपादक,श्री.अक्षय गोंगले उपसंपादक गडचिरोली वार्ता न्युज, , श्री.उमेश गझल्लपल्लीवार विदर्भ न्यूज एक्स्प्रेस प्रतिनिधी, श्री.फुलचंद वाघाडे वैभव पुणे दैनिक प्रतिनिधी गडचिरोली,   

   श्री.सुरेश मोतकुरवार दस्तक न्युज संपादक, श्री.राकेश तेलकुंटलवार गडचिरोली वार्ता न्युज प्रतिनिधी एटापल्ली,श्री. किशोर उसेंडी गोंडवाना शक्ती न्युज संपादक, श्री.श्रीनिवास बंडमवार, श्री.मारोती कांबळे,श्री.तेजस गुजल्लवार, श्री.रोशन नरुले यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular