Friday, July 31, 2026
HomeAheriग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू बनतील - भाग्यश्री ताई आत्राम...

ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू बनतील – भाग्यश्री ताई आत्राम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

वडलापेठ येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन.

गडचिरोली/अहेरी,१५-०१-२०२४::- युवकांनी क्रीडा क्षेत्रात मागे न राहता कोणत्याही खेळामध्ये भाग घेऊन आपले नावलौकिक करावे.क्रीडा क्षेत्रात सातत्य राखून नियमित सराव केल्यास नक्कीच ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू बनतील,असा विश्वास माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केला.  अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील भगवंतराव महाराज स्टेडियम मध्ये राणी दुर्गावती व्हॉलीबॉल क्लब तर्फे आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र कदम,प्रमुख पाहुणे माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,सरपंच सैलु मडावी, नागेश करमे,वडलापेठचे पोलीस पाटील निरंजन दुर्गे,जामगावचे पोलीस पाटील अरविंद नीखाडे,चुटुगुंटा चे उपसरपंच सुरेश आत्राम,खमणचार ग्रा प सदस्य संतोष आत्राम,ऍड पंकज दहागावकर,ग्रा प सदस्य शेवंता कोडापे, महेश बाकीवार,माजी सरपंच मंजुळा आत्राम,सखाराम सुंके,भीमा आत्राम तसेच चिंतलपेठ,वडलापेठ आणि जामगाव परिसरातील व्हॉलीबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   पुढे बोलताना वडलापेठ हा आमच्या पूर्वजांचा गाव असून या गावात आमच्या अनेक आठवणी आहेत. येथील युवकांनी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सांगताच माझ्याकडून प्रथम पारितोषिक घोषित केले.गावातील युवकांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घ्यावे अशी आमची इच्छा आहे.युवकांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव प्रयत्नरत असल्याचे त्यांनी म्हटले.   दरम्यान उदघाटन प्रसंगी गावात प्रवेश होताच वडलापेठ,चिंतलपेठ आणि जामगाव येथील लोकांनी ढोल ताश्यांच्या गजरात ताईंचे स्वागत केले.व्हॅलीबॉल स्पर्धेच्या उदघाटनिय सामन्यात स्वतः भाग्यश्री ताई आत्राम यांनी मैदान गाजविला.तर ताईसोबत मैदानात परिसरातील महिलांनीही साथ दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular