Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

   आलापल्ली हनुमान मंदिर येथील विधिवत पूजा अर्चना करून घेतली दर्शन.

गडचिरोली/अहेरी,२२-०१-२०२४::- तालुक्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक आलापल्ली हनुमान मंदिर येथील आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रामभक्त पवनसुत हनुमान यांचे विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेऊन हनुमान कमिटी यांना देणगी देण्यात आले.

आजच्या दिवशी प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य नवनिर्माण मंदिरात श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्त गडचिरोली जिल्हासह देश भारत गली – गलीत भक्तीमय वातावरण न्हाऊन निघाला आहे.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडूदे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी राम भक्त हनुमांनकडे प्रार्थना केले.सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शन घेतले नंतर येथील भाविकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतले आहे.

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतूजी मडावी,नागेपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज किशोर दुर्गे,चिंट्टू आत्राम,स्वप्नील मडावी,नरेश गर्गम,किशोर दुर्गे,रिंकी आत्राम,प्रमोद गोडसेलवारसह हनुमान मंदीर कमिटीचे सर्वश्री पदाधिकारी सदस्य तसेच आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular