VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत डोंगरगाव (मस्के) येथील नाटकाचे उद्घाटन.
गडचिरोली,२५-०१-२०२४::-नुकतेच अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने देशाला कर्तृत्ववान नेतृत्व मिळाले असून त्यांच्या नेतृत्वात केंद्रात सक्षम व विकासभीमुख सरकार आहे. सरकारने अनेक जनकल्याणाच्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन करीत येणाऱ्या निवडणुकीत रामराज्याच्या विचारावर काम करणाऱ्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन डोंगरगाव (म्हस्के) येथील नाटकाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण देताना केले.
यावेळी मंचावर ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर ,जिल्हा परिषदेचे सदस्य संतोषजी तंगडपल्लीवार, भाजपा तालुक्याचे अध्यक्ष अविनाश पाल ,भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विजयजी खरवडे, ओबीसी भाजपा मोर्चाचे शशिकांत जी मस्के, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या बोबाटे ताई ,ग्रामपंचायत सदस्य सौ चौधरी ताई, नरेंद्र पाटील म्हस्के भुजंगराव म्हस्के, गोलू बांगरे ,शेखर म्हस्के ,भगवान पाटील म्हस्के, तळोधीचे सरपंच अनिलजी तिजारे, कमलाकर जी बोबाटे, यांचे सहप्रमुख मान्यवर उपस्थित होते.
