VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
सार्वजनिक राधाकृष्ण मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन.
गडचिरोली/चामोर्शी,२५-०१-२०२४::- तालुक्यातील मौजा श्यामनगर येथे सार्वजनिक राधाकृष्ण मंदिर येथे श्री श्री राधा कृष्ण अखंड नाम महायज्ञ कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले याप्रसंगी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविक भक्त एकत्र येत असतो पाचशे वर्ष संघर्षा नंतर राम लल्ला च अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा थेट प्रेक्षेपण पाहता आला तसेच शहरी व ग्रामीण भागात कलश शोभा यात्रा, रांगोळी, फाटक्याच्या आतिषबाजीने जल्लोषात राम दिवाळी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी अशोकजी पोरेड्डीवार, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष, सुरेशजी शहा, सुजित जी मुजुमदार, बिधान ब्यापारी, गोहणे जी तथा भक्तगन उपस्थित होते
