Saturday, May 23, 2026
HomeAheriबद्दी पोचम्मा बोनालू उत्सवाला भाग्यश्री ताई यांची उपस्थिती...

बद्दी पोचम्मा बोनालू उत्सवाला भाग्यश्री ताई यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,३०-०१-२०२४::- कोलपल्ली येथे आयोजित बद्दी पोचम्मा बोनालू उत्सवाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई यांनी उपस्थित राहून पूजाअर्चा करत आशीर्वाद घेतले.    कोलपल्ली येथे दरवर्षी बद्दी पोचम्मा बोनालू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यंदा सुद्धा २८ ते २९ जानेवारी दरम्यान हा उत्सव साजरा केला जात आहे.२८ जानेवारी रोजी माता पूजन व २९ जानेवारी रोजी बोनालू कार्यक्रम संपन्न झाला.बोनालू कार्यक्रमात माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी कोलपल्ली येथे उपस्थित होऊन या कार्यक्रमात सहभागी झाले.गावातील माता मंदिरात पूजा करत त्यांनी आशीर्वाद घेतला.तर बोनालू उत्सवात महिलांसोबत रॅलीत सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविला.   यावेळी सरपंच लक्ष्मण कन्नाके, व्येंकटरावपेठाचे सरपंच नीलक्का गेडाम, व्येंकटरावपेठाचे उपसरपंच किशोर करामे,ग्राम कोष अध्यक्ष रवी सडमेक,ग्रा पं सदस्य रीमा मडावी,शुभम आत्राम, शैलेश गेडाम, नागेश पेंदाम,ताजु कुडमेथे,बुच्चा आत्राम,संतोष सडमेक,प्रदीप आत्राम,मनोज सोयाम, मुकेश आत्राम, पवन सोयाम,उमेश अर्का,अरुण सडमेक व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular