Friday, May 22, 2026
HomeSironchaमाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित सिरोंच्या येथे पुरुष बॅडमिंटन...

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित सिरोंच्या येथे पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

बॅडमिंटन स्पर्धेला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती.

गडचिरोली/सिरोंचा,३०-०१-२०२४::- स्थानिक क्रीडा संकुलन येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने तीन दिवसीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पुरुष बॅडमिंटन स्पर्धाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आणि प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अवधेश्वरराव बाबा आत्राम हे होते. त्यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणावर बॅडमिंटन स्पर्धेसाठी स्पर्धकानीं सहभाग नोंदविला होता.    बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शुभेच्छा दिल्या.      बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष डबल प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व 30000/-(तीस हजार रुपये) आणि द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व 15000/-(पंधरा हजार रुपये) तसेच पुरुष सिंगल क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व 10000/-(दहा हजार रुपये) आणि द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व 5000/-(पांच हजार रुपये) सर्व विजेत्या स्पर्धकांना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व युवा नेते अवधेश्वरराव बाबा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.    या कार्यक्रमाला सिरोंच्या तालुका ग्रामीण अध्यक्ष शंकर नरहरी व तालुका शहर अध्यक्ष दिलीप सेनिगरपू व श्री.रंगू बापान्ना,संतोष पडाला,तसेच भाजपाचे पदाधिकारी,स्थानिक कार्यकर्ते,बॅडमिंटन स्पर्धक व प्रतिष्ठित नागरिक,युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular