Friday, May 22, 2026
HomeAheriसिरोंच्या तालुक्यातील अनेक तरुणांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवानेतृत्वावर विश्वास ठेवत केले...

सिरोंच्या तालुक्यातील अनेक तरुणांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवानेतृत्वावर विश्वास ठेवत केले भाजपात प्रवेश…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,३०-०१-२०२४::-भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे गेल्या दोन वर्षांपासून दौरे, जनसंपर्क बघता अहेरी विधानसभा क्षेत्रातील तरुण वर्ग त्यांच्या युवानेतृत्वावर विश्वास करत भाजप पक्षात जाहीर प्रवेश घेत आहेत.

 उर्स महोत्सवनिमित्त माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम कालपासून सिरोंचा तालुक्यात तळ ठोकून बसले आहेत.त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आज विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.विश्रामगृह येथे सिरोंचा तालुक्यातील अनेक तरुणांनी त्यांच्या युवानेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत व पुष्गुच्छ देत सर्वांचे स्वागत केले.

अहेरी विधानसभेतील विविध तालुक्यात वाढलेले दौरे आणि जनसंपर्कमुळे युवा वर्ग काबीज करण्यात त्यांना मोठा यश मिळत आहे.यापूर्वी सुद्धा नुकतेच काही दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यातील विविध गावातील तरुण वर्ग राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन भाजप पक्षात प्रवेश केले.विशेष म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

पक्ष संघटन मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत पुढाकार घेत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला असून सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.त्यामुळेच विविध पक्षातील कार्यकर्ते विशेष म्हणजे युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा शांत आणि संयम स्वभावामुळे ते सर्वांवर भारी पडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular