VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
आष्टी-अनखोडा – उमरी येथील “शिवजन्मोत्सव सोहळा ” या कार्यक्रमात घेतला सहभाग.
संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंतीचा जल्लोष. 
गडचिरोली/आष्टी,१९-०२-२०२४::- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित आष्टी-अनखोडा – उमरी येथील “शिवजन्मोत्सव सोहळा ” या कार्यक्रमाला आ. डॉ. देवरावजी होळी यांनी भेट दिली.
यावेळी आष्टी-अनखोडा – उमरी यादरम्यान काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये स्वतः बाईक चालवून सहभाग घेतला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेशभाऊ बेलसरे, भाजपाचे जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, उपसरपंच वसंत चौधरी, पवन रामगिरीकार ,विनोद भोयर, राजकुमार बोरकुटे, भाजयुमो चे प्रतीकजी राठी यांचे सह शिवजन्मोत्सव सोहळा उत्सव समितीचे पदाधिकारी, शिवप्रेमी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. 
