VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,१९-०२-२०२४::- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे आवाहन गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती कथा भाजप पंचायत राज विभागाचे जिल्हा संयोजक विलास केशवराव देशमुख यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित मौजा गोगाव कुराडी नवरगाव व काटली येथील कार्यक्रमात केले.
मोगलशाहीच्या विरोधात आवाज उठव अवघ्या पंधराव्या वर्षी समाजातील सवाऀना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली.
शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. सन १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा तोरणा सिंहगड पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. अफजलखानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मारण्याची शरयंत्र असले होते पण शिवरायांनी खानाच्या खानाचा डाव ओळखला आणि गनिमी काव्याच्या उपयोग करून अफजल खानाचा शिवरायांनी वध केला याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाई जिंकल्या या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.
आज देश विदेशात सुध्दा महाराजांची जयंती साजरी होत आहे युवकांनी महाराजांचा कायाऀचा बोध घ्यावा व त्यांचे विचार घराघरात पोहोचवावे असे आवाहन माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले.
यावेळी विलास केशवराव दशमुखे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
गोगांव येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष लीलाधर भरडकर, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य धर्मेंद्र मुनघाटे, प्राध्यापक चडगुरलवार, सरपंच राजु उंदीरवाडे, उपसरपंच निलेश दाकोटे आदी मान्यवर उपस्थित होते तर कुराडी येथील कार्यक्रमात सरपंच प्रमोद मुनघाटे, मुख्याध्यापक बांबोळे, डोमाजी पा मुनघाटे, अनिल शेडमाके, देवानंद चुधरी, सचिन राऊत, विनायक चौधरी, निलकंठ मुनघाटे आदी उपस्थित होते तर नवरगाव येथे सरपंच सुनंदा दादाजी दशमुखे, मुख्याध्यापक मानिक शेंडे, गणपती पा चुधरी, दयाराम सेलोटे, पोलीस पाटील राजहंस जांभुळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष ब्रहानंद कोकीळ, वन समिती अध्यक्ष भारती सहारे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र थोरात , कांती चुधरी, कालीदास बोकडे, जयदेव सेलोटे, रुपेश आवारी रमेश आवारी, गुरुदेव झरकर ईश्वर आवारी, दादाजी दशमुखे, देवाजी बोकडे आदि मान्यवर उपस्थित होते. तर काटली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या सिमेंट सदस्य प्राध्यापक धर्मेंद्रजी मुनघाटे, सरपंच अरुणजी उंदीरवाडे, उपसरपंच पार्वताबाई खेडेकर, पोलीस पाटील कृष्णकांत मुनघाटे, ग्रामपंचायत सदस्य गेडामताई, देवाजी भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
