Saturday, May 23, 2026
HomeAheriआलापल्ली येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी...

आलापल्ली येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती.

गडचिरोली/अहेरी,२४ फेब्रुवारी २०२४::- तालुक्यातील आलापल्ली येथील श्री संत गाडगे बाबा धोबी-वरटी समाज संघटनेतर्फे संत गाडगे बाबा स्मृर्ती भवन येथे गाडगे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,ग्रा प सदस्य पुष्पा अलोने,सूचित खोब्रागडे,संघटनेचे अध्यक्ष संतोष वर्मा,उपाध्यक्ष मोरेश्वर मेडपल्लीवार,सचिव प्रकाश मेडपल्लीवार,विजय निमलवार,मलेश निसटूरवार,व्यंकटी भीमराजूरवार आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी आलापल्ली येथ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular