Monday, June 8, 2026
HomeAheriयेनकापल्ली येथे भव्य ३० यार्ड सर्कल क्रिकेट सामने,,माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते...

येनकापल्ली येथे भव्य ३० यार्ड सर्कल क्रिकेट सामने,,माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,२७फेब्रुवारी२०२४::- तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट येनकापल्ली येथे भव्य ३० यार्ड सर्कल क्रिकेट सामने होणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार,महेश बाकेवार,कमला आत्राम,सत्यनारायण मेटपल्लीवार,मधुकर कुमरम,सुरेश आत्राम,विनोद कुमरम,शंकर जाडी,लक्ष्मीबाई सुदाम,माया ताई सुनतकर,आनंद दहागावकर,सुमित मोतकुरवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येनकापल्ली येथे आगमन होताच मंडळातर्फे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून स्पर्धेचे उदघाटन केले.यावेळी ताईंनी खेळाचे महत्व पटवून देतानाच सांघिक भावनेतून खेळण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular